
>> विठ्ठल देवकाते
उत्तराखंडात महाराष्ट्राच्याच खेळाडूंचा जयजयकार झाला. महाराष्ट्राने 38 क्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी 7 सुकर्ण पदकांचे चुंबन घेत 27 पदकांच्या कमाई धमाका केला. एकढेच नक्हे तर अहमदाबाद, गोक्यापाठोपाठ उत्तराखंडातही सर्काधिक पदके जिंकणारे राज्य असा मान मिळकण्याची किक्रमी हॅटट्रिकही महाराष्ट्राने साजरी केली. राज्य खेळाडूंच्या पदक लूटीमुळे महाराष्ट्राने 54 सुकर्णांसह 198 पदकांची कमाई करत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात सलग तिसऱयांदा सर्काधिक पदके जिंकण्याचा पराक्रम केली. हरयाणानेही सुसाट कामगिरी करताना 46 सुकर्णांसह 150 पदके जिंकत तिसरे स्थान काबीज केले आहेत तर सेनादल 67 सुकर्ण पदके जिंकून अक्कलस्थानी कायम राहिला.
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदकांची बाजी मारून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महिलांच्या टेट्रार्थलॉनमध्ये दीक्षा यादवने वैयक्तिक व सांघिक गटात सुवर्णयशाला गवसणी घातली. मिश्र प्रकारातही दीक्षा यादव व सौरभ पाटीलने रुपेरी यश संपादून पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने 4 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्य तर महिला संघाने 5 सुवर्ण, 3 रौप्य पदकांची लयलूट करीत सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकाविला.
महाराष्ट्र केसरी ठरले पदकाचे मानकरी, हर्षवर्धन, अमृताला कांस्य
तब्बल दशकानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आखाडय़ात महाराष्ट्राने पदकाचा षटकार झळकविला आहे. या चमकदार कामगिरीत ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्या मल्लांनीही ठसा उमटविला. भाग्यश्री फंडपाठोपाठ हर्षवर्धन सदगीर, अमृता पुजारी हे ‘महाराष्ट्र केसरी’ विजेते मल्ल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकाचे मानकरी ठरले आहेत. ‘महाराष्ट्र केसरी’च्याच फ्रीस्टाईल 125 किलो वजनी गटात हर्षवर्धन सदगीरने कांस्य पदकावर नाव कोरले.
जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ता व परिणा मदनपोत्रा यांना प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्य
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संयुक्ता काळे व परिणा मदनपोत्रा यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले. तर शताक्षी टक्के हिने चक्क बारावीच्या परीक्षेला दांडी मारून येथे स्पर्धेत भाग घेत रौप्य पदक जिंकले. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या भागीरथी संकुलात आज शेवटचा दिवस आहे महाराष्ट्राच्या महिला जिम्नॅस्ट्सनी गाजविला. स्पर्धेतील आजचा शेवटच्या दिवशी् महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. वैयक्तिक साधन प्रकारातील क्लब या क्रीडा प्रकारात परिणा हिने सुवर्णपदक जिंकताना 25.600 गुणांची नोंद केली. 16 वर्षीय खेळाडू परिणा हिचे या स्पर्धेतील हे पाचवे पदक आहे.
बॅलन्सिंग बीम प्रकारात शताक्षीला रौप्य पदक
बॅलन्सिंग बीम प्रकारात शताक्षी टक्के हिने अप्रतिम कौशल्य दाखवले. त्यामध्ये वुल्फ टर्न हा अवघड प्रकार सादर केला. तिने 11.06 गुण मिळविले. पश्चिम बंगालच्या रितू दास हिने 11.367 गुण मिळवित सुवर्ण पदक जिंकले. शताक्षी ही पुण्यामध्ये इन्फिनिटी क्लब येथे मानसी शेवडे व अजित जरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आजपर्यंत तिने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत अनेक स्पर्धांमध्ये भरपूर पदके जिंकली आहेत.
संयुक्ताला ‘संयुक्त’ विजेतेपद
रिबन या प्रकारात महाराष्ट्राच्या संयुक्ता हिला जम्मू-कश्मीरची खेळाडू मुस्कान राणा हिच्यासमवेत संयुक्त सुवर्ण पदक देण्यात आले. खरंतर मुस्कान हिची कामगिरी चांगली झाली नव्हती. रिबन उचलताना ती पडली होती तसेच एकदा तिची रिबन अंतिम रेषेच्या बाहेर गेली होती. याउलट संयुक्ता हिने ‘माऊली माऊली’ या गाण्याच्या तालावर सुरेख रचना सादर केली होती.
स्वाती शिंदेचे सुवर्ण स्वप्न साकार, आदर्शला रौप्य
कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदेने गेली दशकभर ऊराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटीलला रौप्य पदकावर समाधान मानाने लागले. 53 किलो वजन गटात स्वाती शिंदेने मध्य प्रदेशच्या पूजा जाटला 5-1 गुणांनी नमवून स्पर्धेतील महाराष्ट्रासाठी कुस्तीतील एकमेव सुवर्णयश संपादन केले.
मध्य प्रदेशची आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पूजा जाट विरुद्ध स्वाती शिंदने कडवी झुंज दिली. पहिल्या फेरीमध्ये स्वातीत केवळ 1 गुणांनी आघाडीवर होती. दुसऱया फेरीमध्ये स्वातीने भारंदाज डावावर सलग 4 गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम लढतीत तुफानी कुस्ती करीत स्वातीने मैदान गाजवले. 74 किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरचा आदर्श पाटील, सेनादलाचा जयदीप यांना 10-0 गुणाने पराभूत व्हावे लागले. हरिद्वार येथे संपलेल्या कुस्ती स्पर्धेत 1 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्य अशी 9 पदकांची लूट महाराष्ट्राच्या मल्लांनी केली.
तलवारबाजीत 1 रौप्य, 1 कांस्य
तलवारबाजीत महाराष्ट्राला सांघिक सेबर्स प्रकारात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. चुरशीची लढतीत सेनादलाकडून महाराष्ट्राचा पराभव झाला. वैयक्तिक सेबर्स प्रकारात आदित्य अनगळने कांस्य पदकाची कमाई केली. चौखाम्बा हॉलमध्ये संपलेल्या तलवारबाजीतील सांघिक सेबर्स प्रकारात सेनादलाने महाराष्ट्राला 45-38 गुणांनी नमवले. महाराष्ट्रासाठी अभय शिंदे, आदित्य अनगळ, धनंजय जाधव निखिल वाघ यांनी अंतिम लढतीत लक्षवेधी खेळ केला. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील विजेता संघ असलेल्या महाराष्ट्राने 32-32 गुणापर्यत बरोबरी सामन्यात रंगत आणली होती.
हॉकीत महाराष्ट्राला कांस्य पदक
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बलाढ्य पंजाब संघाला 1-0 असे पराभूत केले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. महिलांच्या गटात मात्र, महाराष्ट्राला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राने पुरुष गटात पंजाबविरुद्ध मिळवलेल्या यशाचा शिल्पकार व्यंकटेश केंचे हा ठरला. त्याने 36 व्या मिनिटाला महाराष्ट्राचा एकमेव गोल नोंदविला. या सामन्यामध्ये पंजाबच्या खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या. त्यांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. तथापि महाराष्ट्राच्या बचाव फळीतील खेळाडूंनी त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले.