Maharashtra Budget Session 2025 – छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना अटक करा, विरोधक आक्रमक

छत्रपती का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, कोश्यारी ते कोरटकर यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो… कोश्यारी ते कोरटकर हरामखोर… हरामखोर… अशी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आज विधानभवन परिसर दणाणून सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, भाई जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना अटक करा, अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच सरकार अशा लोकांना संरक्षण देतंय, याबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.