
राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. पण या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राच्या निधी सहा टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी रुपये 28 हजार 906.92 कोटी निधी दिला होता. यंदा त्यात कपात करून आरोग्य क्षेत्राला 27 हजार 164.91 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्राच्या बजेटमध्ये कपात केल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने या बाबात वृत दिले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी 1 हजार 687 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी शक्यता होती. पण गेल्या वर्षी आणि यंदाही राज्य सरकारकडून या योजनेसाठी 650 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
ठाण्यात 200 खाटांचे रुग्णालय, रत्नागिरीत 100 खाटांचे रुग्णालय तर रायगडमध्ये 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जाईल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
राज्य सरकारने आर्थिक क्षेत्रावरचा बजेट कमी केल्याने या थेट फरक शहरी भागावर होईल अशी भिती जन स्वास्थ्य अभियान संस्थेचे डॉ. रवी दुग्गल यांनी यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने हॉस्पिटल आणि डिस्पेन्सरीसाठी गेल्या वर्षी 6 हजार 98 कोटी रुपये दिले होते. यंदा त्यात घट होऊन केवळ 4 हजार 709 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2 हजार 860 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षी या अभियानाला 3 हजार 805 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधी कमी केल्याने ग्रामीण आरोग्य क्षेत्रावर परिणाम होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागासाठी गेल्या वर्षी 9 हजार 667 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातही घट होऊन यंदा 9 हजार 57 कोटी रुपये देण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी गेल्या वर्षी 196.79 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातही घट होऊन यंदा फक्त 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.