Maharashtra Assembly Election Live – महाराष्ट्रात 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

फोटो - चंद्रकांत पालकर

महाराष्ट्रात 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान, मुंबई शहरात 6.25, तर मुंबई उपनगरात 7.88 टक्के मतदान

राधाकृष्ण विखे-पाटलाच्या कॉलेजमध्ये बाहेरून शिकायला आलेल्या मुलांचे मतदान? काँग्रेस उमेदवाराने विचारला जाब

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र बनवायचे नसेल तर मतदान करा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे आवाहन


अकोल्यात EVM मध्ये बिघाड, थोड्या वेळेसाठी मतदान प्रक्रिया थांबवली

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी बजावला मतदानाचा हक्क


अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र बंद पडले आहे. बी.आर. हायस्कूलमधील बूथ क्रमांक १०६ मध्ये हे EVM बंद पडले आहे. तास दीड तास झाले तरी हे मशीन बंद असल्याने अनेक मतदार आल्या पावली परत गेले आहेत. तांत्रिक कारणामुळे हे मशीन बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क

मुंबईकरांनी मतदानासाठी दाखवला उत्साह

कर्जत जामखेडमध्ये काही पोलिंग बुथवर EVM मशीनवर रोहित पवारांच्या विरोधक आणि डमी उमेदवाराच्या नावापुढे एक काळा डाग असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. याबाबत रोहित पवारांनी याबाबत बुथ प्रमुखाकडे तक्रार केली आहे.


पनवेल विधानसभेच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार लीना गरड यांनी बजावला मतदानाचा हक्क


महाविकास आघाडीचे बेलापूरचे उमेदवार संदीप नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला

 

 

बारामतीमधून १०० टक्के जिंकणार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला विश्वास

अभिनेता अक्षय कुमार मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

 

राज्यात 288 मतदारसंघासाठी मतदान सुरू, सकाळी 7 वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतदारांची रांग