एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे, दुसरीकडे दापोलीतील मिंधे गटाला खिंडार पडून मिंधेचे गड भुईसपाट होत चालले आहेत. मिंधे गटात कार्यरत असलेली दापोली विधानसभा मतदार संघातील मोठ्या लोक संख्येची गावे, वाडया, वस्त्या आणि पाड्यातील माणसे ऐन विधानसभा निवडणुकीत मिंधे गटाला रामराम ठोकून सरळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे मिंधेची चांगलीच तंतरली आहे.
दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी दापोली शहरातील नामदेव मंदिर सभागृहात वणौशी तर्फे नातू या गावातील सुतार वाडीने मिंधे गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना भक्कम साथ देण्यासाठी दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे नातू येथील सुतार वाडीचे अध्यक्ष मंगेश भिकु गिम्हवणेकर यांच्यासह अनिकेत हनुमंत चिंचघरकर, सुयोग चिंचघरकर, संदेश चिंचघरकर, समीर चिंचघरकर, श्रेया चिंचघरकर, निलेश चिंचघरकर, योगेश चिंचघरकर, संकेत चिंचघरकर, रूपेश गिम्हवणेकर आदी प्रमुख सदस्यांसह वाडीने शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत उर्फ भाई मोकल, दिपक चिंचघरकर, शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, सचिन तोडणकर, अर्जुन शिगवण, रविंद्र कालेकर, शिवसेना महिला आघाडी उप जिल्हा संघटीका मानसी विचारे, तालुका संघटक रमेश पांगत, शहर प्रमुख संदिप चव्हाण, विभाग प्रमुख तृशांत भाटकर, रमेश बहिरमकर, शैलेश पांगत, वंदना धोपट, रविंद्र घडवले, एम.आर.शेटये, नईम हूनेरकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.