प्रचारासाठी ‘रॅप’कडे कल! दीड ते अडीच लाखांपर्यंत केला जातोय खर्च

विधानसभा निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील डिजिटल प्रचारासोबत आता काही उमेदवारांची रॅप गाण्यांना डिमांड असल्याचे दिसत आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी रॅप गाण्यांची निर्मिती केली जात असून यासाठी रॅप बनवणाऱयाला दीड ते अडीच लाख रुपयांपर्यंत पैसे मिळत असल्याचेही समोर आले आहे. प्रचाराच्या धामधुमीत लाखो रुपये खर्च करून रॅप गाण्यांची निर्मिती केली जात आहे. रॅप गाण्यांचे लेखक, गायक, कलाकार, संगीतकार, तंत्रज्ञ, छायाचित्रणकार अशा प्रत्येकाला वेगवेगळे मानधन आकारले जात आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवाराचे थेट नाव घेऊन खिल्ली उडवणे, एकमेकांच्या कामाची व कारकिर्दीची गाण्याच्या स्वरूपात तुलना करणे, यासाठी रॅपचा अचूक वापर करून घेतला आहे.