महायुतीत भाजप, मिंधे गट आणि अजित पवार गट यांच्यात जागावाटपाचा घोळ अजून संपलेला नाही. त्यात महायुतीतील घटकपक्षांना आधी मधाचं बोट दाखवून आता ठेंगा दाखवला जात असून त्यातून नाराजी उफाळून येऊ लागली आहे.
आधी बच्चू कडू यांनी दंड थोपटले त्यानंतर महादेव जानकर यांनीही महायुतीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता केंद्रात राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महायुतीच्या जागावाटपात एकही जागा सोडली न गेल्याने आठवले जागे होऊन उठले आणि आज तडक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले. रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या पाच जागा हव्या असल्याचे पत्र त्यांनी फडणवीसांना दिले आहे.
– 2012 पासून आम्ही भाजपसोबत आहोत, पण रिपब्लिकन पक्ष कुठेच दिसत नाही. आमच्या पक्षाला योग्य ते स्थान दिले जात नाही, अशी नाराजी आठवले यांनी व्यक्त केली.