Assembly Election 2024 – या निवडणुकीत माढ्याचे पार्सल परत पाठवणारच – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा विश्वास

महाराष्ट्राला गद्दारीची किड लावणाऱ्या खेकडाफेम आमदार तानाजी सावंत यांचे माढ्याचे पार्सल यंदाच्या निवडणुकीत परत पाठवायचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जीवाचे राण करुन राहुल मोटे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

परंडा येथील राजविरा लॉन्स ऍड रिसॉर्ट येथे आज महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकऱ्यांना संबोधित करताना खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, सरकारमधील नेते स्वत:ची इस्टेट विकून पैसे दिल्याप्रमाणे राज्यभर पैसे दिल्याचा गवगवा करत आहेत. लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या सोयाबिनला तीन हजार भाव दिला आहे. तरी, आपण सुज्ञ मतदार आहात यावेळी तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकदिलाने एकत्रित येऊन लोकसभेप्रमाणेच एक लाखाच्यावर मताधिक्य देऊन आपल्या महाविकास आघाडीचा विजय ऐतिहासिक बनवायचा आहे, असे आवाहन ओमराजे यांनी उपस्थितांना केले.

यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली, ते म्हणाले की, मी आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात अनेक विधानसभा निवडणूका लढविल्या. या सर्व निवडणूका या तत्वावर, वैचारिक पध्दतीने लढविल्या. यावेळी हा मतदारसंघ सुसंस्कृत होता. मात्र, तानाजी सावंत आल्यापासून मतदारसंघात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तानाजी सावंत हे गुंडगिरीला वाव देत असून त्यांना धडा शिकविण्याची गरज आहे, असे राहुल मोटे म्हणाले.

यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल मोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख रंजीत पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटक जिनत सय्यद, उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, विधानसभा समन्वयक दिलीप शाळू, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील, भूम तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, वाशी तालुकाप्रमुख तात्यासाहेब गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक उमादेवी रणदिवे, उपतालुका प्रमुख अब्दुल सय्यद, भगवान बांगर, टिंकू कदम, ऍड. विनायक नाईकवाडी, बाळासाहेब गुळके, शहरप्रमुख ऍड. प्रकाश आवरे, माजी शहर प्रमुख दिपक मुळे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, शिक्षक शिवसेना राज्य संघटक कोहिनूर सय्यद, कॉग्रेस आय तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी, ऍड. सिराज मोगल, बाळासाहेब गुळके, विहग कदम, गणेश साठे, अशोक नलावडे, परांडा शहर प्रमुख रईस मुजावर, उपाध्यक्ष नूर चौधरी, काँग्रेस आय परंडा तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, अवधूत क्षिरसागर, मोईज सय्यद, विधानसभा उपाध्यक्ष श्रीमंत भडके, राजाभाऊ नलावडे, साहेबराव हांडे, अलीमशा पठाण, साईराज तुटके यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.