महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे. शिवसेना ( (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस प्रत्येकी 85 जागांवर लढणार आहे. महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेत 270 जागांवर सहमती झाल्याचे जाहीर करण्यात आले. उर्वरित जागांवर इतर मित्रपक्षांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.