लातूर जिह्यात उमेदवारांची भाऊगर्दी

मराठवाडय़ातील लातूर जिह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. जिह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून यात तब्बल 192 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघात अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. येत्या 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे आता लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी केली जात आहे. जिह्यातील सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघांत काटय़ाची टक्कर होण्याची शक्यता असल्याने एका एका मताला महत्त्व दिले जात आहे.

अर्ज वैध ठरलेले उमेदवार

लातूर ग्रामीण 37

लातूर शहर 34

अहमदपूर 41

औसा 36

उदगीर 22

निलंगा 22