बोरिवली मतदारसंघातून भाजपने मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघातून स्थानिक नेते व माजी खासदार गोपाळ शेट्टी निवडणूक लढवतील अशी आशा भाजप कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे बोरिवलीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अशातच सोमवारी गोपाळ शेट्टी यांनी ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्या मंगळवारी 29 ऑक्टोबरला गोपाळ शेट्टी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
#WATCH | Mumbai: Former BJP MP Gopal Shetty has announced to file nomination as an Independent from Borivali seat. BJP has announced Sanjay Upadhyay as its official candidate from Borivali.
He says, “This is not about me not getting a ticket. I did not ask for a ticket. But… pic.twitter.com/pQL2f8MsyC
— ANI (@ANI) October 28, 2024
उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदार असलेल्या गोपाळ शेट्टी यांचे भाजपने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत तिकीट कापले होते. भाजपने त्यांच्या जागी पीयूष गोयल यांना तिकीट दिलेले. त्यावेळी गोपाळ शेट्टी यांनी पीयूष गोयल यांच्यासाठी प्रचार केला होता. मात्र आता विधानसभेत तिकीट मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती पण भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे.