महाविकासची आघाडी; एक्झिट पोलचा कौल… काँटे की टक्कर

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात सरासरी 65 टक्के मतदान झाले. मतदानानंतर आता प्रतीक्षा आहे ती निवडणूक निकालाची. त्याआधी विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल मतदान प्रक्रिया संपल्यावर जाहीर झाले आहेत. यामध्ये काही संस्थानी महाविकास आघाडी आणि महायुतीत ‘काँटे की टक्कर’ असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर इलेक्टोरल एज, सास ग्रुप आणि भास्कर पोल या तीन संस्थांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात महाविकास आघाडी महाबाजी मारत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण, घटनाबाहय़ सरकार, महागाई, महिला सुरक्षेचा प्रश्न, बेरोजगारी, धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न. यामुळे महायुतीच्या विरोधात जनतेत प्रचंड संताप दिसून येत होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानदेखील ते दिसून आले व आता मतदानोत्तर चाचण्यांमधूनही महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

इलेक्टोरल एज

मविआ 150
महायुती 118
इतर 20
भास्कर रिपोर्टर्स पोल
मविआ 135-150
महायुती 125-140
इतर 20-25

सास ग्रुप हैदराबाद

मविआ 147-155
महायुती 127-135
इतर 10-13

लोकशाही रुद्र

मविआ 125-140
महायुती 128-142
इतर 18-23