Maharashtra Assembly Election 2024 – आदित्य ठाकरे उद्या वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे उद्या म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांची लोअर परळ येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 पासून ते बीएमसी हब वरळी नाक्यापर्यंत रॅली निघणार आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2019 विधानसभा निवडणूकीत वरळीतून दणदणीत विजय मिळवला होता. आदित्य ठाकरे यांनी 67 हजाराहूंन अधिक मताधिक्यानं विजय मिळवलेला. ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या आदित्य यांनी विजय मिळवत इतिहास घडवला होता.