
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब समर्थनाच्या वक्तव्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. आझमी यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली, त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी, नंतर अर्धा तास आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
Santosh Deshmukh संपूर्ण सरकारच बरखास्त झाले पाहिजे! आदित्य ठाकरे आक्रमक
सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तारांकित प्रश्नांची सुरुवात होण्याआधीच सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. आमदार सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर आणि मंत्री उदय सामंत यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. विधानसभेतील शिवसेना गट नेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी मिळाली असता, सत्ताधारी पक्षाने गदारोळ केला.
धडधडीत पुरावे असतानाही फडणवीस खोटं बोलत असतील तर…, संजय राऊत यांनी फटकारले
गोंधळ वाढताच विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने नंतर अर्धा तास आणि दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला.