
विधिमंडळ अधिवेशन ( Maharashtra Assembly Budget Session 2025 ) सुरू होऊन चार दिवस उलटले तरी विधान भवनात पडलेला कचरा आणि धूळ स्वच्छ न केल्यामुळे विधान भवनात येणारे कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, आमदारांचे कार्यकर्ते यांना सर्दी-खोकल्याची लागण झाली आहे. विधान भवनातील तळमजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंत प्रत्येक दालनात डागडुजीनंतर स्वच्छता न केली गेल्यामुळे प्रचंड धूळ पसरली आहे. स्वच्छता मोहीम हाती घेतली असली तरी बहुतांश ठिकाणी एअरकंडिशन्ड असल्यामुळे धूळ तिथल्या तिथेच फिरत राहते. त्यामुळेच सर्दी-खोकल्याची लागण होत असल्याची माहिती विधान भवन तैनात वैद्यकीय कर्मचाऱयांकडून मिळाली.