राज्यातील 72.7 टक्के किशोरवयीन विद्यार्थी सोशल मीडियावर ऑक्टिव्ह असल्याचे समोर आले आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रथम संस्थेने देशपातळीवर ‘असर’ 2024 हा शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात राज्यातील 14 ते 16 वयोगटातील 55.2 टक्के विद्यार्थ्यांची सोशल मीडियावर खासगी प्रोफाईल असल्याचे म्हटले आहे. या वयोगटातील 63.3 टक्के विद्यार्थीच अभ्यासासाठी स्मार्टफोनचा वापर करतात, असेही या अहवालातून समोर आले आहे. सोशल मीडिया हाताळण्यात मुलींपेक्षा मुलांची संख्या अधिक असून 75.1 टक्के मुले तर 70 टक्के मुली सोशल मीडियावर आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्राची डिजिटल साक्षरता (टक्केवारीत)
(14 ते 16 वयोगट)
– घरी स्मार्टफोन असलेले 94.2
– स्वतःचा स्मार्टफोन आहे 19.2
– स्मार्टफोनचा वापर करणारे 84.1
– स्मार्टफोनचा अभ्यासासाठी वापर करणारे 63.3
– स्मार्टफोनचा सोशल मीडियासाठी वापर करणारे 72.7
– सोशल मीडियावर खासगी प्रोफाईल असलेले 55.2
– प्रोफाईल पासवर्ड बदलणारे 55.7
– तिसरीतील 4.2 टक्के विद्यार्थ्यांना अक्षर ओळख नाही, तर 13.4 टक्के विद्यार्थ्यांना अनेक अक्षरांची ओळख नाही. 37 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे पुस्तक वाचता येते. – आठवीतील 36.3 टक्के मुले भागाकार करू शकतात, तर पहिलीतील 25.8 टक्के विद्यार्थ्यांना 99 पर्यंत अंक ओळख आहे. – 14 ते 16 वयोगटातील मुले अलार्म सेट करणे, माहिती शोधण्यासाठी स्मार्टफोन वापरतात. – अद्यापही 48.3 टक्के शाळांमध्ये संगणक नाहीत.
‘असर’ अहवालातील अन्य निरीक्षणे (महाराष्ट्र)
सरकारी शाळांतील पटसंख्या वर्ष 2022 च्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये शिकणाऱया मुला-मुलींची संख्या वर्ष 2024 मध्ये कमी झाली आहे. पहिली ते पाचवीमध्ये वर्ष 2022 मध्ये 77.3 टक्के मुले शिकत होती. ही संख्या कमी होऊन वर्ष 2024 मध्ये 71.5 वर आली आहे, तर मुलींची संख्याही कमी होऊन 80.9 वरून 75.2 टक्क्यांवर आली आहे. सहावी ते आठवीत मुलांची संख्या वर्ष 2022 मध्ये 52 टक्के होती. वर्ष 2024 मध्ये ती 43.1 टक्क्यांवर आली आहे, तर मुलींची संख्या 53.6 वरून 46 टक्क्यांवर आली आहे.