राज्यात 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुजा खेडकरमुळे चर्चेत आलेले दिवसे यांना बढती

राज्यात प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकाऱ्यांचाय बदल्या झाल्या आहेत. राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काहींना बढती देण्यात आली आहे. पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेले अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बढती करण्यात आली आहे.

जयश्री भोज यांची अन्न व पुरवठा विभागाच्या सचिवपती, जितेंद्र डुड्डी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी, विनीती सिंघल यांची पर्यावरण मंत्रालयाच्या मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. आय.ए कुंदन कामगार विभागाचे मुख्य सचिनव, मिलिंद म्हैसकर, वेणुगोपाल रेड्डी, निपुण विनायक, संतोष पाटील, हर्षदीप कांबळे, विकासचंद्र रस्तोगी या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.

सुहास दिवसे यांची बढती करण्यात आली असून पुण्यातील भुमी अभिलेख जमाबंदी आयुक्त, संचालकपदी करण्यात आली आहे. तर दिवसे यांच्या जागी आता जितेंद्र हुड्डी यांची नेमणूक पुणे जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.