महाराजा रणजित सिंह यांचे सुवर्ण सिंहासन ब्रिटनमध्ये

महाराजा रणजित सिंह यांचे 19 व्या शतकातील सुवर्ण सिंहासन सध्या ब्रिटनमध्ये आहे. हे ऐतिहासिक सिंहासन हिंदुस्थानात परत आणण्याची मागणी आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी केली आहे. सोन्याच्या चादरीने झाकलेले हे सिंहासन सध्या लंडनच्या व्हिक्टोरिया- अल्बर्ट संग्रहालयात आहे. प्रसिद्ध सोनार हाफिज मुहम्मद मुल्तानी यांनी 1805 आणि 1810 दरम्यान महाराजा रणजित सिंह यांच्यासाठी सुंदर सिंहासन बनवले होते. महाराजांच्या दरबाराची भव्यता दर्शविणारे हे सिंहासन आहे.

– ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1849 मध्ये पंजाब ताब्यात घेऊन शिखांचा खजिना आपल्या सोबत नेला. त्यामध्ये हे सिंहासनही होते. महाराजा रणजित सिंह यांचे सिंहासन ईस्ट इंडिया कंपनीच्या संग्रहालयात ठेवण्यासाठी लंडनला पाठविण्यात आले होते.