उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 12 वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. यावेळी कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या सुविधांचे आयोजन केले जात आहे. या कुंभमेळ्याला 13 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यासाठी देशभातून नाही तर परदेशातूनही लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र रेल्वे, बस, विमान प्रवासात तिकीट न मिळाल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेकडून अनेक विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही सोयीस्कर ठिकाणाहून रेल्वे प्रवास करू शकता.
रेल्वेने नव्या वर्षात आपले नवीन वेळापत्रक जारी केले आहे. महाकुंभासाठी 13 हजार गाड्या चालवल्या जातील. ज्यामध्ये 3 हजार विशेष गाड्यांचा समावेश असेल. या महाकुंभात 45 कोटी भाविक सहभागी होतील. त्यापैकी 10 कोटी रेल्वेने प्रवास करतील असा अंदाज आहे. यासाठी IRCTC ने पुणे ते प्रयागराज अशी खास ‘भारत गौरव ट्रेन’ सुरू केली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना जेवण आणि राहण्याची सुविधाही मिळणार आहे. या रेल्वेतून किमान 750 प्रवासी प्रवास करू शकतात. रेल्वे 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे.
तिकीटांची किंमत किती
इकॉनॉमी क्लास – 22, 940 रुपये
3AC – 32,440 रुपये
2AC- 40,130 रुपये
कोणत्या स्थानकांचा समावेश –
‘भारत गौरव ट्रेन’ 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. पुणे-प्रयागराज भारत गौरव रेल्वे मार्गामध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, वाराणसी आणि अयोध्या या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.