![Mahakumbh fire News](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Mahakumbh-fire-News-696x447.jpg)
महाकुंभमध्ये पुन्हा आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सेक्टर 18 आणि 19 मधील तंबूंना ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत अनेक तंबू जळू खाक झाले आहेत. ही आग नेमकी कशी लागली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, याआधीही 9 फेब्रुवारी (रविवार) रात्री महाकुंभमेळा परिसरातील अरैलच्या दिशेने असलेल्या सेक्टर 23 मध्ये आग लागली होती. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. गॅस सिलिंडरमुळे आग लागल्याचे सांगितले जात होते.