कुंभमेळ्यापासून चर्चेत आलेले आयआयटीएन बाबा अभय सिंग नैराश्येत आहेत का? सवाल आता सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. बाबाचे व्हिडिओ पाहून त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी होत आहे. केवळ सोशल मीडिया युजर्सच नाही तर अभय सिंगचे पालक आणि प्रशासनाकडूनही ही मागणी होत आहे.
अभय सिंग आता नैराश्येत जात आहेत. मुलाखत देताना आणि बोलताना अचानक रडू लागतात. तसेच ते आजारी असल्याचेही दिसून येत आहे, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनीही बाबा अभय सिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. “मी हे खूप गंभीरपणे सांगत आहे की त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या कुटुंबाने आणि मित्रांनी त्वरित लक्ष द्यावे”, असे विनोद कापरी म्हणाले.
अभय सिंग यांना कुंभमेळ्यात आणणाऱ्या बाबांनीही त्यांच्याशी संबंध तोडले आहेत. आता ते ही त्यांच्याबद्दल बोलू इच्छित नाही.
पुरस्कार विजेते सर्जन डॉ. बी.एल. बैरवा यांनीही अभय सिंगबद्दल एक्सवर पोस्ट करत त्यांना उपचारांची गरज असल्याचे म्हटले आहे. महाकुंभात अनेक लोकांनी (सोशल मीडिया इन्फ्लुएंसर) त्यांचा फायदा घेतला, टीआरपी मिळवला आणि पैसे कमवले आहेत. हा माणूस खूप वेदना, मानसिक ताण, नैराश्येत आहे. आज रडत आहे, असेही बैरवा यांनी पुढे नमूद केले.