
महाकुंभमेळ्यापासून आयआयटीन बाबा अभय सिंह चर्चेत आले आहे. मात्र, सध्या ते वादात अडकत आहेत. त्यांनी टीम इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत भाकीत केले होते. त्यानंतर तो ट्रोल झाला होता. त्यानंतर जमावाला स्टिडिओत घुसून त्याला मारहाण केली होती. आता जयपूर पोलिसांनी गांजा आणि अमंली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. तसेच त्याने सोशल मिडीयावर आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आयआयटीयन बाबा म्हणजेच अभय सिंगने सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी बाबांचे ठिकाण शोधले आणि एका हॉटेलमधून बाबांना ताब्यात घेतले. बाबांकडे गांजा आणि अंमली पदार्थही सापडले. जयपूरच्या रिद्धी-सिद्धी भागातील एका हॉटेलमधून त्याला पकडले. बाबाजवळ गांजा आणि इतर अंमली पदार्थही सापडले. त्यांनी सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिल्या नंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी त्याचे ठिकाण जयपूरमधील रिद्धी-सिद्धी येथील एका हॉटेलमध्ये शोधले आणि त्यांना ताब्यात घेतले.
हॉटेलमधील त्यांच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना गांजासह इतर काही अंमली पदार्थ सापडले. यानंतर पोलिसांनी बाबाला अटक केली. याबाबत अभय सिंग उर्फ आयआयटीयन बाबा म्हणतात की पोलिसांना थोडासा प्रसाद (गांजा) सापडला आहे. मी त्यांना सांगितले की जर तुम्ही या प्रसादावर गुन्हा दाखल केला तर कुंभमेळ्यात इतके लोक तो पितात, तर त्या सर्वांना अटक करा. तसेच आत्महत्येच्या धमकीबाबत तो म्हणाला की, थोडासा प्रसाद घेतल्यानंतर काय घडले ते माहिती नाही. त्याच्याकडे आढळलेला गांजा कमी प्रमाणात असल्याने त्यांना समज देत सोडण्यात आले.