
महाकुंभला ( Mahakumbh 2025 ) तुफान गर्दी वाढत असताना, दुसरीकडे मात्र एक बिभत्स आणि धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. हे केवळ इतक्यावरच थांबले नाही तर, टेलिग्राम ( Telegram ) नामक सोशल माध्यमावर आता या फोटोंसाठी स्पेशल दर आकारण्यात येत आहेत. कुंभमध्ये आपली नजर चुकवून कुणीतरी अशा पद्धतीने व्हिडीओ शूट करत आहे ही खरोखरच धक्कादायक बाब आहे, अशा प्रकरच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून येत आहेत.
सध्याच्या घडीला सोशल मीडियावर महाकुंभमधील महिलांच्या स्नानाचे फोटो हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. केवळ व्हायरल नाही तर, या फोटोंची खुलेआम विक्रीसुद्धा सुरू आहे. टेलिमेट्रीयो टूलनुसार, 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान टेलिग्राम चॅनलवर ‘खुले मे स्नान’ हे वाक्य शोधणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टेलिग्राम चॅनलवर सध्याच्या घडीला 50 पेक्षा जास्त महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे.
टेलिग्राम प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या व्हिडीओ विक्रीतून पैसा कमावला जातो. काही टेलिग्राम चॅनल्स तर अर्धनग्न व्हिडीओ प्रसारित करण्यासाठी ओळखले जातात. टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून महिलांचे कुंभमधील व्हिडीओ त्यासोबत इतर ठिकाणचे अनेक व्हिडीओ सुद्धा शेअर केले जातात.
ये एक अति अशोभनीय एवं संवेदनशील मामला है कि महाकुंभ में नारी के मान-सम्मान की रक्षा करने में भाजपा सरकार विफल रही है। महाकुंभ में पुण्य कमाने आई स्त्री शक्ति की तस्वीरों के सरेआम बेचे जाने के समाचार पर श्रद्धालुओं में भारी आक्रोश है। नारी की गरिमा की सुरक्षा करना सरकार का कर्तव्य… pic.twitter.com/ew8uD9XQxX
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 19, 2025
घडणाऱ्या घटनेवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाकुंभमधील स्नानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर विक्रीसाठी असल्यामुळे अखिलेश यादव यांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या जबाबदारीकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून महिलांच्या मानसन्मानाचे रक्षण करण्यात भाजपा सरकार हे अपयशी ठरले आहे. महाकुंभमध्ये महिलांच्या बाबत घडलेल्या या घटनेमुळे आता जनसामान्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या मानसन्मानाचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.