Mahakumbh 2025 – महाकुंभमध्ये पुन्हा अग्नीतांडव, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

महाकुंभमधील आगीचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. सोमवारी पुन्हा एकदा महाकुंभ परिसरात सेक्टर 8 मध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर विझवण्यास सुरुवात केली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कल्पवासींनी रिकामे केलेल्या तंबूंमध्ये ही आग लागली. आग वेगाने पसरत होती. मात्र अग्नीशमन दलाने परिसराला घेराव घातला आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

दोन दिवसांपूर्वीही महाकुंभमध्ये आगीची घटना घडली होती. या आगीत अनेक तंबू जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती.