
प्रयागराज येथे अरैल घाटावर कुंभस्नान करणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर संगमवर एकच गोंधळ उडाला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी भाविकांची धावाधाव सुरू झाली. मधमाशा हल्ला करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाकुंभ संपण्यासाठी अजून सात दिवस शिल्लक आहेत. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 49.02 लाख भाविकांनी संगममध्ये पवित्र स्नान केलं. तर गेल्या 38 दिवसांत एकूण 55.56 कोटी भाविकांनी स्नान केलं.