![mahakumbh fire](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mahakumbh-fire-696x447.jpg)
कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. संगममधील सेक्टर 18 च्या शंकराचार्य मार्गावर तंबूत आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुंभमेळ्यात आग लागण्याची तिसरी घटना आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.