![Mahakumbh 2025](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Mahakumbh-2025-696x447.jpg)
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळातून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात संगमावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक येत आहेत. आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी स्नान केले आहे. पण प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाले असून स्नान करण्यायोग्य नसल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण (CPCB) मंडळाच्या अहवालत म्हटले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला (NGT) नद्यांच्या पाण्यावर एक अहवाल सादर केला आहे. महाकुंभमेळ्या दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील विविध ठिकाणी नदीच्या पाण्यात सांडपाण्याची पातळी ( Faecal Coliform ) इतकी वाढली आहे की सन्नासाठी हे पाणी गुवणत्तेनुसार नाही. म्हणजेच प्रदूषणामुळे नदीचे पाणी स्नान करण्यायोग्य नाही, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.
महाकुंभ प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळ्यात 54.31 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती आहे. तर त्रिवेणी संगमावर 1.35 कोटी भाविकांनी सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत स्नान केल्याची माहिती आहे. फेकल कोलिफॉर्म (सांडपाणी) आढळने हे नदीचे पाणी दूषित होण्याचे चिन्ह आहे. नदीत सांडपाणी ( Faecal Coliform ) स्वीकार्य मर्यादा ही 2500 युनिय प्रति 100 एमएल आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे (NGT) अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायिक सदस्य न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल आणि तज्ज्ञ सदस्य ए. सेंथिल वेल यांच्या खंडपीठासमोर प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नद्यांमध्ये वाहून जाणारे सांडपाणी रोखण्याच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू होती. यावर नियमांच्या उल्लंघनांकडे लक्ष वेधून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 3 फेब्रुवारी रोजी अहवाल दाखल केला होता.
नदीच्या पाण्याची गुणवत्ता विविध प्रसंगी सर्व निरीक्षण ठिकाणांवर सांडपाण्याच्या संदर्भात स्नानासाठी प्राथमिक पाण्याच्या गुणवत्तेशी सुसंगत नव्हती. प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान मोठ्या संख्येने लोक नदीत स्नान करतात. ज्यामुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढते, असे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी एनजीटीने उत्तर प्रदेश सरकारला अहवाल पाहण्यासाठी आणि उत्तर दाखल करण्यासाठी एक दिवसाचा अवधी दिला आहे.
उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने (UPPCB) सर्वसमावेशक कार्यवाही अहवाल दाखल करण्याच्या NGT च्या पूर्वीच्या निर्देशांचे पालन केले नाही. यूपीपीसीबीने काही पाण्यांच्या चाचणी अहवालांसह एक पत्र दाखल केले. यूपीपीसीबीच्या केंद्रीय प्रयोगशाळेच्या प्रभारींनी 28 जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्रासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा आढावा घेतला असता विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी आढळून आल्याचे पीठाने म्हटले आहे.