Mahakumbha 2025 – कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृत्यू नैसर्गिक दाखवण्यासाठी पोलिसांकडून दमदाटी, कुटुंबीयांना मृतदेह ही देईना

मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाला. तर 60 हून अधिक लोक जखमी झाले. उत्तर प्रदेश सरकारकडून हे सर्व मृत्यू नैसर्गिक घोषित करण्यात येत आहेत. मृतांच्या नातेवाईकांकडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे लिहून घेत मृतदेह ताब्यात घेत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी एका खासदाराच्या मुलाने ते पत्र शेअर केले आहे.

कुंभमेळ्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांकडून पोलीस बळजबरीने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे लिहून घेत आहेत. त्यानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याऐवजी घेऊन जात आहेत.

चेंगराचेंगरीत मृत झालेल्या ग्वाल्हेरच्या तरुणाच्या कुटुंबीयांकडूनही मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे लिहून घेण्यात आले होते. हे पत्र व्हायरल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.