महाकुंभमेळा संपला तरी 869 लोक अद्याप बेपत्ता

प्रयागराज येथील महाकुभमेळ्याची सांगता होऊन दहा दिवस उलटले तरी अद्याप कुंभकाळात बेपत्ता झालेल्या 869 लोकांचा शोध लागलेला नाही. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान हा कुंभमेळा सुरू होता. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने जोरदार मार्केटिंग करण्यात आले होते. तब्बाल 66 कोटी लोकांनी कुंभात स्नान केल्याची आकडेवारी उत्तर प्रदेश सरकारने दिली. मात्र करोडोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे प्रचंड हाल झाले.