
गुढीपाडव्यानिमित्त कांजूरमार्ग पूर्व येथील संस्कृती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे 29 मार्च आणि 30 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 9.30 या वेळेत भांडुप पूर्व दातार कॉलनी येथील कांजूर को-ऑप हौसिंग सोसायटी मैदानात महागुढी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ‘इतिहास गडकिल्ल्यांचा, वारसा शिवकालीन संस्कृतीचा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची छायाचित्रे, शिवकालीन नाणी, परदेशी आणि हिंदुस्थानी नोटांचे प्रदर्शन, आदिलशाही लारीन नाणी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे शंभुराई नाणे विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय 29 मार्चला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लेझीम व दांडपट्टा यांचे शिवकालीन युद्धकला, लेझीम दांडपट्टा, तलवारबाजी व लाठीकाठी असे साहसी खेळ तसेच 30 मार्चला शाहिरी गर्जना कलामंच कर्जत, रायगड प्रस्तुत शाहीर गणेश ताम्हाणे आणि सहकारी यांचा पोवाडा कार्यक्रम होईल.