अमरावती मधील मेंढपाळांच्या समस्येसाठी बच्चू कडू यांनी आंदोनल केले. या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर सहभागी झाले होते. यावेळी मेंढपाळांशी संवाद साधताना जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला. ”माझी तुम्हाला विनंती आहे की यापुढे मोठ्या पक्षांना मतदान करू नका. काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे, अशी संतप्त टीका महादेव जानकर यांनी केली आहे.
”लोकसभा विधानसभेला यांनी मला आणि बच्चू कडूंना पाडलं. मी जिंकलो असतो तर मला खासदारकी मिळाली असती. पण मला पाडलं. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत गेलो असतो. त्यामुळे यापुढे मोठ्या पक्षांना मतदान करू नका. काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे, असे महादेव जानकर म्हणाले.