
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड व दर्शन घुले यांना मारहाण करणारा कैदी महादेव गिते याच्या सह चार कैद्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान गिते याने दुसऱ्या तुरुंगात जात असताना वाल्मीक कराडनेच आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह सहा जण परळी कारागृहात कैद आहेत. सोमवारी या तुरुंगात बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी महादेव गिते याच्यात व वाल्मीक कराडमध्ये वादावादी झाली. त्यानंतर गितेने वाल्मीक कराडला मारहाण केली. कारागृह प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत हा राडा नियंत्रणात आणला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
गितेने आरोप फेटाळले
गितेने वाल्मीक कराडला मारहाण केल्याचे आरोप फेटाळले आहेत. वाल्मीक कराडनेच आपल्याला मारहाण केल्याचे आरोप त्याने केले आहे. त्यासाठी त्याने तुरुंगातील सीसीटीव्ही तपासायला सांगितले आहेत.