महाड शहराजवळील वीर रेल्वे स्टेशनजवळ गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघांचा मृत्यू आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. सूर्यकांत सखाराम मोरे, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
या अपघाता समीर सुधीर मुंडे आणि सुरज अशोक नलावडे हे दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे तर शुभम राजेंद्र मातळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
हे सहाजण महाडकडून लोणेरे येथे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH06BE4041 ने जात असताना रात्री 12:30 चे सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलावर उभी केली. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅनने स्कॉर्पिओला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाणपूलालगतच्या सर्व्हिसरोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली. अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.