महाड, श्रीवर्धनमध्ये गद्दारांना धडा शिकवू; शिवसैनिकांचा एकमुखी निर्धार

महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून मशालीचे तेज दाखवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी एकमुखाने केला. मुंबईस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी व युवासैनिक यांची बैठक नुकतीच शिवसेना भवन येथे झाली. यावेळी पक्ष देईल त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला.

दक्षिण रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा, श्रीवर्धन विधानसभेतील मुंबईस्थित शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी उपनेते विजय कदम यांनी विधानसभा निवडणूक व पक्ष बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी दोन्ही मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. बैठकीला दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क संघटक ज्योत्सना दिघे, महाड विधानसभा संपर्कप्रमुख अमित मोरे, श्रीवर्धन विधानसभा सहसंपर्कप्रमुख दिलीप करंदीकर, महाड विधानसभा संपर्क संघटक साधना वरसकर, श्रीवर्धन विधानसभा संपर्क संघटक आरती शिंदे, संपर्कप्रमुख सतीश शेलार, शैलेश फुलारे, सुनील जाईलकर, कविता नलावडे, गीतांजली फुलारे, ज्योती मनवे, वंदना पयर, लता मुंडे, तालुका संघटक सीताराम मेस्त्री, समन्वयक सुदेश उतेकर उपस्थित होते.