महाकुंभमध्ये रुद्राक्ष माळा विकणारी इंदूरची मोनालिसा भोसले सौंदर्यामुळे काहीच दिवसांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली. मोनालिसाच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी, तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि तिची मुलाखत घेण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. परंतु मोनालिसा आता या सर्व गोष्टींमुळे संतापली आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिने एका व्यक्तीचा फोटो काढत असताना मोबाईल जमीनीवर आपटला आहे.
View this post on Instagram
रुद्राक्ष माळा विकणारी मोनालिसा काहीच दिवसांमध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. विशेष म्हणजे गुगलसह सर्वच सोशल मीडियावर मोनालिसा हे नाव मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे. तसेच इंस्टाग्रावरवर फक्त सात दिवसांमध्ये तिच्या फॉलोअर्सची संख्या 170k च्या पार गेली आहे. त्यामुळे तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी, व्हिडीओ शूट करण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे तिला व्यवसाय करण सुद्धा कठीण झालं आहे. या सर्व गोष्टींमुळे मोनालिसा संतापली आहे. लोकांपासून वाचण्याचा ती प्रयत्न करत आहे. याच दरम्यान तिचा फोटो काढणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल मोनालिसाने जमीनीवर आपटला आहे. तसेच लोकांपासून वाचण्यासाठी ती सध्या मास्क घालून फिरत आहे. मोनालिसाचे हे दोन्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरादर व्हायरल होत आहेत.