बॉम्बे IIT मधून एरोस्पेस इंजिनीअर, डिजाइनिंगमध्ये उच्च शिक्षित पदवी, तरीही मनः शांती नाही; IIT बाबाची महाकुंभ मेळ्यात तुफान चर्चा

महाकुंभमध्ये देश-विदेशातील नागरिक सहभागी झाले आहेत. यात अनेक नेते, सेलिब्रेटी, युटुबर्स यांनी देखील सहभाग घेताला आहे. यापैकीच एक साध्वी हर्षा रिछारिया ज्यांची सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होत आहे. अशात आता आणखी एका नावाची चर्चा सुरू आहे. ज्यांना लोग आईआईटी बाबा यांच्या नावाने ओळखतात. त्यामुळे आता साध्वी हर्षा बरोबरच साधू आयआयटी बाबा देखील चर्चेचा विषय बनले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभय सिंह असे आयआयटी बाबाचे नाव आहे. याचा जम्न हरयाणामध्ये झाला. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एयरो स्पेस अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले आहे. मात्र, इतके शिक्षण घेऊनही त्यांनी सन्याय घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची प्रचंड चर्चा आहे. संन्यास घेणे यापेक्षा दुसरी चांगली कोणती स्थिती नाही, असे त्याने सांगितले.

महाकुंभमेळ्यात आईआईटी बाबाने सगळ्याचे लक्ष वेधले. लोकांनी याच्याबाबत माहिती मिळताच अनेकांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी त्याने त्याच्या जीवनप्रवासावर भाष्य केलं. कितीही शिक्षण घ्या… ज्ञान घ्या… परंतु शेवटी तुम्हाला इथेच यायचे आहे, असे त्याने सांगितले. अभय सिंह यांनी आयआयटीमध्ये चार वर्षे शिक्षण घेतले. मात्र, यानंतर त्याने इंजीनियरिंग सोडून फोटोग्राफी सुरू केली. पण त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची पदवी नसल्यामुळे त्याला काम मिळत नव्हते, असे त्याने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhey Singh (@abhey_singh)

काम मिळवण्यासाठी पदवीची गरज होती. यासाठी त्याने डिजाइनिंगमध्ये उच्च शिक्षित पदवी मिळवली. यानंतर फोटोग्राफीला सुरुवात केली. फोटोग्राफीसाठी अनेक शहरात फिरलो. लोकांसोबत काम केलं. तरीही मन: शांती मिळाली नाही. त्यामुळे मी हे सगळं सोडून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला, असे अभय सिंह याने सांगितले. आयआयटी बाबा म्हणजेच अभय सिंह याने आत्तापर्यंत अनेक धार्मिक स्थाळांना भेट दिल्या आहेत. गेले चार महिने अभय काशी आणि ऋषिकेशमध्ये राहिले होते. आता सध्या आयआयटी बाबा प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले आहेत.