![siddhivinayak](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/01/siddhivinayak-696x447.gif)
माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरवर्षी माघी गणेश जयंतीनिमित्त श्रीसिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. 30 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजता शंकर महादेवन यांचे गायन, शिवमणी यांचे ड्रम वादन होईल.
31 जानेवारीला सायंकाळी 6.15 वाजता आरती अंकलीकर-टिकेकर यांचे शास्त्रीय गायन तर रात्री 8.45 वाजता उस्ताद तौफीक कुरेशी (डीझेम्बे), गुरुप्रसाद गांधी (हार्मोनियम) यांचे सादरीकरण होईल.
1 फेब्रुवारीला गणेश जयंतीनिमित्त सिद्धेश मणेरीकर यांचे कीर्तन आणि दुपारी 4 वाजता रथ शोभायात्रा होईल. 2 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता पंडित नीलाद्री कुमार (सतार वादन), पंडित सत्यजित तळवलकर (तबला वादन) यांचा तर 3 फेब्रुवारीला रात्री 8.45 वाजता डॉ. एल. सुब्रमण्यम, कविता कृष्णमूर्ती यांचा परफॉर्मन्स होईल. 4 फेब्रुवारी रोजी हवन करून पुर्णाहुतीने सांगता होईल. उत्सवाच्या कालावधीत दररोज श्रींची काकड आरती, महापूजा, मंगल आरती, सामूहिक नामस्मरण, शेजारती केली जाणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.