बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये रेल्वे दुर्घटना घडली आहे. नवी दिल्लीवरुन इस्लामपूरला जाणाऱ्या मगध एक्सप्रेसची कपलिंग तुटल्याने ट्रेन दोन भागांमध्ये विभागली. सदर घटना आज सकाळी 11 च्या दरम्यान घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Big accident on Buxar-Patna railway line, #MagadhExpress split into two parts, panic created, accident happened between Dumraon and Raghunathpur station, accident happened a minute after moving ahead from Tudiganj! Last time the train overturned near Raghunathpur station!#Buxar pic.twitter.com/u7TWuOWFhp
— Uday Pratap (@udaypratapbuxar) September 8, 2024
पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सरस्वती चंद्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, नवी दिल्लीवरून इस्लामपूरला जाणाऱ्या मगध एक्सप्रेस (20802) या गाडीची कापलिंग अचानक तुटली. त्यामुळे ट्रेन तुरीगंज आणि रघुनाथपूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दोन भागांमध्ये विभागली गेली. घटनेची माहिती मिळता बचाव पथक आणि तांत्रिक पथके घटनास्ठळी पोहचली आहेत. ही घटना कशामुळे घडली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे सरस्वती चंद्रा म्हणाले.