
एखाद्या नवऱ्याची बायको जर मोबाईलवर पॉर्न पाहात असेल तर ही बाब म्हणजे तिने नवऱ्याशी क्रूरता केली असे होत नाही, असे स्पष्ट मत मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे या आधारावर नवऱ्याला बायकोपासून घटस्फोट मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने सुनावणी करताना दिला. तामीळनाडूत एका पतीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. आपली पत्नी नेहमी मोबाईलवर पॉर्न बघते. घरात कुठलेही काम मन लावून करत नाही. तसेच ती विनाकारण पैसे खर्च करतेय, असे गंभीर आरोप केले होते. परंतु कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर घटस्फोट देता येणार नाही, असे सांगितले. पुरुष पॉर्न पाहात असेल तर ही पद्धत सामान्य समजली जाते, तर स्त्रियांना याबाबत दोष का दिला जातो, असे कोर्टाने नमूद केलेय.