Madhya Pradesh भयंकर घटना! प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्यांना लुटले; मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार

Trainee Army Officers Robbed In Madhya Pradesh, Woman Friend Raped

 

दोन तरुण लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणींवर मंगळवारी संध्याकाळी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील जाम गेटजवळ सशस्त्र हल्लेखोरांनी निर्घृण हल्ला केला. सुरुवातीला लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महू आर्मी कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेत असलेले अधिकारी दुपारी छोटी जाम येथील फायरिंग रेंजजवळ मैत्रिणींसोबत गेले होते.

अचानक काही लोकांनी त्यांना पिस्तूल, चाकू आणि काठ्या घेऊन घेरलं. पुरुषांनी प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि महिलांना मारहाण करण्यापूर्वी त्यांच्याकडील पैसे आणि वस्तू लुटल्या.

जेव्हा हल्लेखोरांनी एक अधिकारी आणि एका महिलेला ओलीस ठेवले आणि इतर अधिकारी आणि एका महिलेला ₹ 10 लाखांची खंडणी मागण्यासाठी पाठवले तेव्हा परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.

घाबरून, अधिकारी घाईघाईने त्याच्या युनिटकडे परतला आणि त्याच्या कमांडिंग ऑफिसरला माहिती दिली. अधिकाऱ्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली.

अधिकारी, लष्करी जवानांसह घटनास्थळी दाखल झाले, परंतु जवळ येत असलेली वाहने पाहून हल्लेखोर पळून गेले. सकाळी 6.30 च्या सुमारास चौघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी महू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन्ही अधिकारी जखमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वैद्यकीय तपासणीतही एका महिलेवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले, अशी बातमी पीटीआयने बडगोंडा पोलीस स्टेशनचे प्रभारी लोकेंद्र सिंग हिरोरे यांच्या हवाल्याने दिली.

‘लूट, दरोडा, बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, अशी माहिती इंदूर ग्रामीण एसपी हितिका वासल यांनी सांगितली. इतर गुन्हेगारांचा शोध सुरू असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.