शिवपुरीत हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक सुरक्षित

मध्य प्रदेशातील शिवपुरीजवळ हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळल्याची घटन घडली आहे. या घटनेतून वैमानिक सुदैवाने बचावला आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी एक पथक पाठवले. मात्र, या अपघातामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात लष्कराचे लढाऊ विमान कोसळले. या अपघातात दोन्ही वैमानिक बचावले असून ते जखमी झाले आहेत. लढाऊ विमान शेतात कोसळल्यानंतर त्याला लगेचेच आग लागली. घटनेनंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. वैमानिकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

शिवपुरीजलील नरवर तहसीलमधील दब्रासनी गावात लष्कराचे लढाऊ विमान गुरुवारी दुपारी शेतात कोसळले. त्यानंतर लगेचच आग लागल्याने विमान जळून खाक झाले आहे. दोन्ही वैमानिक पूर्णपणे सुरक्षित आहेत. घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

हवाई हल्ल्यादरम्यान ग्वाल्हेर हवाई दलातून मिराज 2000 ने उड्डाण केले. त्यानंतर शिवपुरीजवळ हा अपघात झाला. त्यावेळी त्यात दोन वैमानिक होते. जे किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही वैमानिक स्वतःहून बाहेर पडले होते. दोन्ही वैमानिकांना उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले आहे.