Madhya Pradesh रुग्णालयातील एसी पडले बंद, रुग्णांना स्वत:चे पंखे सोबत घेऊन यावे लागतात

madhya-pradesh-jabalpur-victoria-hospital-icu-emergency-ward-ac-not-working

भाजप शासित मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सरकारी सेठ गोविंद दास व्हिक्टोरिया जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (ICU) गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत बिकट स्थितीत आहे. आयसीयूमधील एअर कंडिशनर (एसी) गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांना स्वत:सोबत पंखे आणावे लागत आहेत.

इंडिया टुडे टीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसारित केलं आहे. ही बाब राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा पैसे नसल्याचे कारण देण्यात आले आहे.

चार महिन्यांपासून एसी ठप्प असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील 20 दिवस उलटले आहेत आणि ICU ची स्थिती अजूनही तशीच आहे. लोक टेबल फॅन आणून ICU सारख्या महत्त्वाच्या विभागात आपल्या रुग्णांची व्यवस्था स्वत:च करत आहेत.

उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिलाष पांडे यांनी अलीकडेच व्हिक्टोरिया रुग्णालयाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णांना आश्वासन दिले की शक्य तितक्या लवकर या समस्येचे निराकरण करण्यासाठी पावले उचलली जातील आणि आयसीयूच्या अशा भयंकर अवस्थेसाठी दोषी आढळलेल्या लोकांना शिक्षा केली जाईल, मात्र अद्याप कुठलीही तशी पावलं उचल्ल्याचे दिसत नसल्याचे स्थानिक सांगत आहे.

रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ मनीष मिश्रा यांच्या माहितीनुसार मांडला आणि दिंडोरीसह इतर जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्येही अशीच परिस्थिती कायम आहे.