अजबच..! चक्क दुचाकीचे केले अंत्यसंस्कार, स्मशानघाटात जळाली अनोखी ‘चिता’

आत्तापर्यंत स्मशानभूमीमध्ये मृत शरीरांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. मात्र मध्य प्रदेश येथील सीहोर जिल्ह्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. स्मशान भूमीत चिता जाळण्याच्या ठिकाणी दुचाकीचे अंत्यसंस्कार केले आहेत. सिहोर जिल्ह्यातील इछावर भागामध्ये घडलेली ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

इछावर भागातील दिवडिया मार्गावरील या स्मशानात काही अज्ञात लोकांनी दुचाकी लाकूड आणि शेणाच्या गोवऱ्यांच्या मध्यभागी ठेवून पेटवून दिली. अज्ञातांनी लाकूड आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करत दुचाकी पेटवली. घटनेची माहिती मिळताच स्मशानात बघ्यांची गर्दी जमली होती. स्मशानभूमीत जाळलेल्या दुचाकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही करामत चोरांनी केली असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. स्मशानात समाज कंटकांचा वावर जास्त असतो, त्यामुळे असे अनुचित प्रकार येथे वारंवार घडत असतात. सदर प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस अधिकाऱ्यांची ही लक्षात आले आहेत. मात्र याप्रकरणी आत्तापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार आल्यास याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे इछावर पोलीस स्थानकातील प्रभारी बृजेश कुमार यांनी सांगितले.