मध्य प्रदेशात धार्मिकस्थळी मद्यविक्रीवर बंदी, नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू

मध्य प्रदेश सरकारने दारू विक्रीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून महत्त्वाच्या 19 धार्मिक ठिकाणी दारू विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे. महाकालेश्वर मंदिर शहर उज्जैन, अमरकंटक, ओंकारेश्वर आणि इतर प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत हा निर्णय घेतला आहे. या धोरणानुसार, मध्य प्रदेश महत्त्वाच्या धार्मिक भागातील दारू दुकानांसाठी कोणतेही नवीन परवाने दिले जाणार नाहीत. तसेच विद्यमान दुकाने सुरू ठेवण्यास मनाई आहे. धार्मिक ठिकाणची दारूची दुकाने बंद पडल्यामुळे होणाऱ्या महसुलातील तोट्याची भरपाई करण्यासाठी सरकारने इतर ठिकाणी दारूच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडला, मुलताई, मंदसौर, अमरकंटक, साल्कनपूर, बर्मनकला, बर्मनखुर्द, लिंगा, कुंडलपूर, बंदकपूर, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, मंडलेश्वर, ओरछा, मैहर, चित्रकूट, पन्ना, दादा या नगरपालिका आणि ग्रामपंचायत परिसरात असलेली दारूची दुकाने बंद होणार आहेत.