रोहित शर्मा फलंदाजीत वारंवार अपयशी ठरत असल्यामुळे त्याला विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत असले तरी सिडनी खेळायचे की नाही हा निर्णय रोहितच्याच हातात आहे. प्रशिक्षक आणि संघव्यवस्थापनाने रोहितशी चर्चा करून हा तिढा सोडवतील, अशी प्रतिक्रिया हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू मदनलाल यांनी दिली आहे.
टॉस होण्यापूर्वी खेळपट्टी आणि वातावरण पाहिल्यानंतर रोहितबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रोहित एक यशस्वी कर्णधार असल्यामुळे त्याला काय वाटते, यावर त्याचा निर्णय ठरणार आहे. जर त्याला वाटले की आपण आपला फॉर्म परत मिळवू शकतो तर तो सिडनीच्या मैदानावर दिसेल. अन्यथा त्यात आत्मविश्वासाची कमतरता भासल्यास तो विश्रांती करण्याचा निर्णय घेऊ शकतो, अशीही शक्यता मदनलाल यांनी बोलून दाखवली. रोहित असा खेळाडू आहे की, त्याला आपल्या फॉर्मबद्दल भीती वाटत असेल तर तो आपल्या जागी दुसऱया फलंदाजाला संघात खेळवू शकतो. राहुलने सिडनीत खेळण्याचा निर्णय घेतला तर तो कोणत्या स्थानावर खेळणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ शकतो, असेही मदनलाल म्हणाले.
सिडनी कसोटीनंतर रोहित निवृत्त
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली तर याचा मला आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया मला आश्चर्य वाटणार नाही, असे मत व्यक्त केलेय रवी शास्त्री यांनी. मी आता रोहितच्या आसपास असेन तर त्याला एकच म्हणेन, जा आणि धमाका कर. तू आता ज्या पद्धतीने खेळतोस, ते पाहायला आवडत नाहीय. तू सिडनीतही खेळावेस आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवाव्यास. मग पाहू पुढे काय होते ते. सिडनीतच रोहित आपल्या कारकीर्दीचा निर्णय घेईल आणि तो या कसोटीनंतर निवृत्त झाला तर मला जराही आश्चर्य वाटणार नाही. जर सिडनी कसोटीनंतर हिंदुस्थानी संघ डब्ल्यूटीसी फायनलच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची शक्यता वाढली तर त्याचा निर्णय लांबणीवर जाऊ शकतो.