आणखी एका भाषायुद्धासाठी तयार, एम. के. स्टॅलिन यांचा मोदी सरकारला इशारा

मोदी सरकार हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप करत तामीळनाडूत सत्ताधारी पक्षानेच प्रचंड आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. मोदी सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाविरोधात तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पंबर कसली असून आणखी एका भाषायुद्धासाठी आपण तयार असल्याचा इशारा मोदी सरकारला दिला आहे. अशा प्रकारे तामीळनाडू सरकारने हिंदी भाषाविरोधी धोरणाची धार आणखी तीव्र केली आहे.

पेंद्र सरकार आमच्यावर दबाव आणण्यासाठी आमचे पैसे रोखत असून आम्ही दोन हजार कोटी रुपयांसाठी आमचे हक्क सोडणार नाही, अन्यथा तामीळ समाज दोन हजार वर्षे मागे जाईल, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. गेल्याच आठवडय़ात उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा हिंदी भाषाविरोधी भूमिका मांडताना हिंदीमुळे तामीळ भाषाच संपुष्टात येईल, असा इशारा दिला होता. दरम्यान, कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवल्याने लोकसंख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आठ जागा गवमाण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन लोकसभा सीमांकनाच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी येत्या 5 मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.