साधूंची वेशभूषा करून फसवलं, अखेर गावकऱ्यांनी ओखळलं अन् चौघांना चांगलचं चोपलं

साधूंच्या वेशात नागरिकांना फसवूण मौल्यवान वस्तू आणि पैसे लुटणाऱ्या चार तरुणांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सदर घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमधील महुरा सरैया गावची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चौघेजण साधूंच्या वेशात गावात फिरत होते. शुक्रवारी सकाळी साधूंच्या वेशात असलेले हे ठग माहुरकला गावातील एका दुकानात गेले. त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून डोक्याला टिळा लावला आणि दुकानदाराला मादक पदार्थ मिसळलेला प्रसाद खायला दिला. प्रसाद खायला देण्यापूर्वी दुकानदाराला 1,100 रुपये देण्यासाठी राजी केले. प्रसाद खाल्ल्यानंतर दुकानदार बेशुद्ध पडल्यानंतर चोरट्यांनी पळून जाण्यापूर्वी दुकानातून मोहरीची तीन पोती आणि रोख रक्कम चोरी केली.

या चोरीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे चोर गंगाखेडा येथे पोहोचले. तेथे स्थानिकांनी त्यांना ओळखले आणि चोरट्यांना चांगला चोप दिला. यानंतर चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आकाश, अक्षय, राकेश आणि अमित अशी या चोरट्यांची नावे असून ते मेरठमधील समसापूर गावचे रहिवासी आहेत. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन चोरीचा माल जप्त केला आहे. तसेच रुद्राक्ष आणि प्रसाद खायला लावून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.