उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील आमदार निवासात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांना आमदार निवासातच्या पायऱ्यांवर एक तरूण आढळून आला त्याच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या.त्यामुळे पोलिसांनी जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
लखनऊच्या हुसैनगंज भागात एक बहुमजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीतच आमदारांना घरे दिली जातात. याच आमदार निवासाजवळील पायऱ्यांवर सुमारे 25 ते 30 वर्षांच्या तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. अद्याप तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
हुसैनगंज पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना तरुणाकडून कोणताही कागद किंवा मोबाईल अथवा अन्य कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सध्या सखोल चौकशी केली जात आहे.