मुसळधार पावसाने उत्तर प्रदेश विधानभवनात पाणी शिरले, मुख्यमंत्री योगींना दुसऱ्या मार्गाने बाहेर काढले

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये बुधवारी मुसळधार पावसाने कहर केला. पावसाचे पाणी विधानभवनापर्यंत पोहोचले आणि लखनऊत विधानभवनचा तळमजला जलमय झाला. अखेर विधानभवनच्या गेट क्रमांक 1 वरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाहेर काढण्यात आले.

लखनऊमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसाने सर्व परिसर जलमय झाला. पावसाचे पाणी विधानभवनच्या तळमजल्यावर पोहोचले आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दुसऱ्या रस्त्याने बाहेर आणावे लागले. तर पावसाचा जोर कायम राहिल्याने आणि वाहन पाण्यात अडकल्याने निजामाबाद आजमगढचे समाजवादी पार्टीचे आमदार आलम बदी यांना स्कूटरने घरी जावे लागले. हवामान विभागाने पुढील 7 दिवस पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसासह वीज कोसळण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी वर्ष 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सादर केला.