
उत्तरप्रदेशात विधानसभेच्या 10 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. लखनऊचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष विजय बहादूर यादव यांनी आपल्या अनेक साथीदारांसोबत मिळून समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. यावेळी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव उपस्थित होते. विजय यादव यांनी पंचायत निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा घरवापसी केली आहे.
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रदेश कार्यालयात विजय बहादूर यादव यांना बुधवारी सदस्यता दिली. विजय यादव यांनी मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
विजय बहादूर यादव यांनी सपामध्ये घरवापसी केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान जिल्हा पंचायत अध्यक्ष यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.